महाराष्ट्र
Trending
सरकारला ‘गुलमोहर’ कांड दडपायचे आहे ! आमचा जबाब का घेतला नाही
माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केले सवाल

DHULE | – धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्र 102 मध्ये आढळून आलेल्या 1 कोटी 84 लाखांच्या घबाडाप्रकरणी तब्बल 9 दिवसांनंतर गुन्हा रजिस्टर झाला. याचे श्रेय मिडीयाला जाते. मिडीयाने हे प्रकरण लावून धरले म्हणून मुजोर राज्य सरकारला वाकावे लागले, असे सांगतांनाच शिवसेना नेते माजी आ. अनिल गोटे यांनी तक्रारदार म्हणून मी व सहकारी नरेंद्र परदेशी आमच्या पैकी कुणाचाही जबाब पोलिसांनी नोंदविला नाही.
कारण तेथे काय घडले याचे पोलिसांना काहीही देणं घेणं नाही. कारण सरकारला हे प्रकरण दडपून टाकायचे आहे. याप्रकरणात हे कलम 124 लावले गेले. म्हणजे समाधानकारक हिशोब न देता येणे, ज्यात केवळ तीन महिने शिक्षा आणि 500 रुपयांचा दंड आहे, त्यामुळे गुन्हा दाखल करायचे नाटक कशाला करायचे, असा सवालही माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.