महाराष्ट्र
Trending
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघा जणांच्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या,

BHIWANDI भिवंडी शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या मुसक्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या असून, त्यांच्याजवळ एक बीएमडब्ल्यू कार दोन गावठी कट्टा, दोन पिस्टल असा एकूण १७ लाख ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे,
अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. शोएब शाहीद शेख,वय २३,नौशाद मक्सुद आलम खान, वय २२, अफताब अफसर शेख,वय २१,सर्व रा.दरभंगा बिहार व शहाबुद्दीन अलीमुद्दीन अन्सारी, वय २० वर्षे,रा.शानदार मार्केट अशी अटक आरोपींची नावे आहेत.