महाराष्ट्र
Trending

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 8 कोरोनाचे रुग्ण

CHH. SAMBHAJINAGAR  – सध्या देशात व राज्यात जी काही कोविडची परिस्थिती आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे सध्या कोरोना संदर्भामध्ये दक्षता काळजी घेतली जात असून, आरोग्य विभागातर्फे आरटीपीसीआर चाचणी घेणे सुरू आहे. महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत 400 पेक्षा जास्त आरटीपीसीआर चाचणी केली आहे. यामध्ये आठ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यांची वेळोवेळी तपासणी करून, उपचार सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही.

राज्य शासनाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या गाईडलाईनचे वेळोवेळी नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. 8 रुग्ण होम सोल्युशन मध्ये आहे. त्यांच्या घरच्यांची सुद्धा काळजी घेतला जात आहे. त्यांना सुद्धा दोन डोस दिले आहेत. आणि रुग्णांच्या बाबतीमध्ये विभागातर्फे विचारणा केली जाते. खबरदारी म्हणून शहरातील प्रायव्हेट हॉस्पिटल महानगरपालिका रुग्णालय त्यातील बेड आरक्षित केलेले आहे. सर्व काळजी प्रशासन घेत असून, शासनाने दिलेल्या गाईडलाईन्स पाडल्या जात असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य अधिकारी पारसमंडळाच्या यांनी दिली आहे.

Back to top button
error: Content is protected !!