महाराष्ट्र
Trending

चारित्र्याच्या संशयावरून चाकूने वार करून पत्नीला केले ठार

SOLAPUR  – कोल्हापूर परिसरातील जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या घाटमार्गात निर्जनस्थळी चाकूने वार करून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार केले. त्यानंतर आरोपी पतीने आज सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशन गाठत खुनाची हकिकत सांगितली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पतीला कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

सचिन चंद्रशेखर राजपूत (वय ३४, रा. कालबिलागी, ता.जमखंडी)याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी शुभांगीचा (वय २८, रा. कालबिलागी, ता. जमखंडी,बागलकोट) खून केल्याचे सांगितले.

आरोपी सचिन हा बागलकोट जिल्ह्यातील असून तो अहमदाबाद येथे भारतीय सैन्यदलात ८ वर्षे होता. त्याने एका महिलेसोबत अश्लील वर्तन केलेच्या कारणावरून त्याला सैन्यदलातून बडतर्फ केले होते. तो मोटारसायकलवरून सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात आला. मी कोल्हापूर येथून आलो असून, मी माझ्या पत्नीवर चाकूने वार करून तिला घरात बंद करून आलो असल्याचे सांगितले. फौजदार चावडी पोलिसांनी लागलीच कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून विचारणा केली. शुभांगी आणि सचिन दोघे जण गप्पा मारत बसले होते. यावेळी शुभांगी बेसावध असताना सचिनने शुभांगीच्या चेहरा, गळा आणि पोटावर चाकूने वार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.यामध्ये संबंधित पत्नीचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!