Uncategorizedमहाराष्ट्रराष्ट्रीय
Trending
रिक्षाचालकाने पैशाच्या वादातून डीएडची परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थीच्या पोटात चाकू भोसकून केला खून

CHH.SAMBHAJINAGAR – डीएडची परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थी व रिक्षाचालक यांच्यात भाडे देण्या-घेण्यावरून वाद झाला. यातून दोघांमध्ये झालेल्या मारहाणीत चालकाने पॅसेंजरच्या पोटात चाकू भोसकून खून केला. ही घटना नगर नाका येथील इन्कम टॅक्स कार्यालयाजवळ घडली.
मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यात जयराम बबन पिंपळे (वय २८) रा. श्रीरामपूर जिल्हा, अहिल्यानगर असे मयत परीक्षार्थीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.