महाराष्ट्र
Trending
छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू ५ जण गंभीर जखमी

CHH. SAMBHAJINAGAR | – छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या. तर इतर ५ जण गंभीर जखमी आहेत.
प्राथमिक माहितीनुसार (स्वाती खैरनाथ वय ३५, हल्ली मुक्काम रांजणगाव मुळगाव लासलगाव), (रेखा गायकवाड वय ३८, सौभाग्य चौक एन ११ हडको) असं मयत झालेल्या महिलांची नावे आहेत.
या उद्यानात वाघासह इतर प्राणी आणि मुलांना खेळण्यासाठी जागा असल्याने नेहमी वर्दळ असते. काहीच वर्षांपूर्वी बांधलेल्या प्रवेशद्वाराच्या बांधकामाबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो आहे.