महाराष्ट्र
Trending

घरफोड्या करुन धुमाकूळ घालणाऱ्या तिघांना अटक

BULDHANA |  – बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात शिवाजीनगर पोलिसांनी घरफोड्या करून धुमाकुळ घालणाऱ्या तिघा सराईत आरोपींना अटक करून सुमारे ७३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातील ज्योती शांताराम गायकवाड यांनी घरफोडीची तक्रार नोंदवल्या वरून गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन खामगाव येथीलच अनिकेत गणेश देशमुख (२५), अभिषेक भीमराव हेलोडे (२१) व मंगेश छगन जाधव या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून. दागिने व रोख रक्कम असा एकूण ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईत अंमलदार संदीप टाकसाळ, लालसिंग चव्हाण, राजू कोल्हे, प्रवीण गायकवाड, पल्लवी बोर्डे, सायबर शाखेचे पोलिस ठोंबरे यांनी केली आहे. तर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय सहिता 112 अंतर्गत किरकोळ संघटित गुन्हेगारी प्रस्ताव ही दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!