
BEED | अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी सखोल चौकशी व्हावी – योगेश क्षीरसागर
– बीड मधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी निषेध नोंदविला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी क्षीरसागर यांनी केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शिक्षक लोकप्रतिनिधीच्या घरी होते.
त्यानंतर ते फरार झाले. यंत्रणेवर दबाव कोणी टाकला? याची चौकशी आणि सीसीटीव्ही तपासावेत अशी मागणी योगेश क्षीरसागर यांनी केली. आज बीडमध्ये शैक्षणिक बंद पुकारण्यात आला, रस्त्यावर उतरून निषेध सुरू आहे. तर सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंद मध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन क्षीरसागर यांनी केले.