महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला!

NANDURBAR | – राज्यातील परिचारिकांच्या विविध मागण्या वेतन त्रुटी निवारण अधिपरिचारिका परिसेविका व पाठ्यनिर्दशिका या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारण करावे. राज्यातील परिचारिकांना केंद्रशासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता 7200, गणवेश भत्ता 1800, मंजूर करावा व पात्र परिचारिकांना शैक्षणिक भते मंजूर करावे.

परिचर्या संवर्गाचे 2021 मधील नव्याने मंजूर केलेल्या सेवा प्रवेश नियमांमध्ये अनेक त्रुटी आहेत त्यात दुरुस्ती कराव्यात.पदनाम बद्दल केंद्रशासनाप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या पदनामा मध्ये बद्दल करण्यात यावा. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्याना बदली धोरण 2018 मधून वगळून प्रशासकीय बदली न करता विनंती व तक्रार आधारित बदली करावी. राज्य शुश्रूषा सेल स्थापन सक्षम करून परिचारिकांचे संवर्गाचे 3 प्रतिनिधी व सर्व पदे भरावीत.

अश्या विविध मागणीसाठी आज जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी बेमुदत संप पुकारला. यावेळी परिचरिका संघटनेचे जिल्हा अध्यक्षा मनिषा वळवी, उपाध्यक्ष अंजू पाडवी व सर्व परिचारिका व पदाधिकारी उपस्थित होते .

Back to top button
error: Content is protected !!