महाराष्ट्र
Trending

पालकमंत्र्यांच्या बंगल्याजवळ बेधडक चोरी 😨 सातारा भागात गुप्त हालचाली; चोरीचं कोडं सुटेना

पालकमंत्र्यांच्या बंगल्याजवळून मोटारसायकल चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

छत्रपती संभाजीनगर :

सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पालकमंत्री शिरसाठ यांच्या बंगल्याजवळून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंगल्याजवळून दुचाकी चोरीस

पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटनुसार, दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री शिरसाठ यांच्या बंगल्याजवळ, सातारा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. फिर्यादी सुरज गजानन पवार, वय २५ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. जाभांबा, तालुका व जिल्हा छत्रपती संभाजीनगर, यांनी त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल सुधाकर नगर प्लॉट नंबर १, गृह निर्माण सोसायटी, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे उभी केली होती.

अज्ञात चोरट्याने लबाडीने नेली मोटारसायकल

फिर्यादी यांची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. चोरीस गेलेल्या मोटारसायकलची अंदाजे किंमत २० हजार रुपये असल्याची नोंद पोलिस रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल, तपास सुरू

या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अज्ञात असून त्याचा पूर्वइतिहास निरंक असल्याची नोंद आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शेख करत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी केली आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!