महाराष्ट्र
Trending

घराच्या वादातून पोटच्या पोरानेच केला जन्मदात्या पित्याचा खून

DHULE  – शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात घराच्या वादातून मुलाने वडिलांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी घरात राहू नये, या कारणावरून सुरू असलेल्या भांडणाचा अखेर खूनापर्यंत शेवट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सिंगा तुमड्डु पावरा (वय ७०) आणि त्यांचा मुलगा सुनिल सिंगा पावरा (वय ३०) हे दोघे बोराडी येथे एकत्र राहत होते. त्यांनी काही काळापूर्वी मिळून घर बांधले होते. मात्र, वडिलांनी त्या घरात राहू नये, यावरून सुनिल हा दोन दिवसांपासून सतत वडिलांशी वाद घालत होता.दि. १ जून २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास वडील झोपेत असताना सुनिल याने त्यांना शिवीगाळ केली आणि भरात लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिंगा पावरा यांना तातडीने हिरे मेडिकल कॉलेज, धुळे येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयताचा दुसरा मुलगा आमावश्या सिंगा पावरा (वय ३५) याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात भा. नि. सं. कायदा २०२३ चे कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुनिल सिंगा पावरा यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोसई मिलिंद पवार करीत आहेत.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. जयपाल हिरे (शिरपूर तालुका पोलीस ठाणे), पोसई मिलिंद पवार, पो.हे.को. संदीप ठाकरे , रमेश माळी, भुषण चौधरी , संजय चव्हाण ,मोहन पाटील ,रणजीत वळवी,अल्ताफ मिजां यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!