महाराष्ट्र
Trending
छत्रपतींच्या नावावर बाजारपेठेतील 75 कोटींची जागा कुणालाही जन्मात हडप करु देणार नाही
अनिल गोटे

DHULE | – धुळे शहरातील मनोहर चित्रमंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, स्मारकासाठी लागणारी बाजारपेठेतील 75 कोटी रुपयांची जागा आमदार अनुप अग्रवाल यांनी हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
या विरोधात आपण न्यायालयात देखील दाद मागितली असून, मी स्वतः न्यायालयात हा खटला लढवणार. आमचा विरोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला नसून, स्मारकाच्या नावाखाली जागा हडप करण्याला असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी कोणत्याही परिस्थितीत जागा हडप करू देणार नाही, असा इशारा देखील अनिल गोटे यांनी दिला आहे.