महाराष्ट्र
Trending

जालन्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस, एकाच दिवशी तीन जणांना चावा

JALNA- जालन्यात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला असून एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांत तीन जणांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. यात एका लहान मुलासह महिला आणि बस चालकाचा समावेश आहे. शहरातील रहेमानगंज येथे अनस खान अतिक खान हा सात वर्षाचा मुलगा अंगणात खेळत होता. त्याचवेळी एक कुत्रा धावत आला आणि त्याच्या डोक्याला चावा घेतला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. तर दुसरी घटना कबाळी मोहल्ला येथे एका महिलेला कुत्र्याने चावा घेतलाय. त्याचबरोबर परळी वैजनाथची एसटी बस मुक्कामी जालन्यातील एसटी डेपोत आली.

यावेळी बसचालक मोहन चव्हाण हे गाडी लावून जात असताना अचानक एका कुत्र्याने त्यांना चावा घेतला. त्यांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रकार सातत्याने वाढत चालले असून महानगर पालिकेने काढलेल्या टेंडरचं काय झालं असा सवाल उपस्थित करत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button
error: Content is protected !!