महाराष्ट्र
Trending

सिनेस्टाईल पाठलाग करून कुटुंबाला बेदम मारहाण

BEED  – बीडच्या आष्टी येथे झालेल्या भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात का दिली? असा जाब विचारत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली. मारहाणीत या कुटुंबातील सदस्य जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे वास्तव्यास असणाऱ्या ढोबळे कुटुंबातील शारदा ढोबळे यांचे जमिनीच्या वादातून शेजारील नरवडे कुटुंबाशी भांडण झाले. आणि याच भांडणाची तक्रार आष्टी पोलीस ठाण्यात देऊन घरी परतताना ढोबळे कुटुंबावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून रस्त्यात गाडी आडवी लावून कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली.

टोळक्याकडून झालेल्या मारहाणीत शारदा ढोबळे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य जखमी आहेत. दरम्यान या प्रकरणाची दाखल घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप पसार आहेत.

Back to top button
error: Content is protected !!