महाराष्ट्र
Trending
चिखली- मेहकर मार्गावरील खैरव फाट्याजवळ ट्रक कार, दुचाकी अशा तिहेरी अपघातामध्ये दुचाकी वरील तिघेजण ठार

BULDHANA | चिखली- मेहकर मार्गावरील खैरव फाट्याजवळ ट्रक कार आणि दुचाकी अशा तिहेरी अपघातामध्ये दुचाकी वरील तिघेजण ठार झाले. अपघातात ठार झालेले तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. तर डस्टर कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला असून त्याला चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील घाटनांद्रा येथील गणेश गायकवाड त्यांची पत्नी व मुलगा हे दुचाकीने मेहकरवरून येत असताना खैरव फाट्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने कारला कट मारला त्यावेळी कार दुचाकीवर जाऊन आदळली या अपघातमध्ये दुचाकी वरील तिघेजण घटनास्थळी ठार झाले. तर डस्टर कारचा ड्रायव्हर जबर जखमी झाले असून त्याला चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले आहे.