सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे अतिशय भयानक व्हिडिओज ? एका बड्या नेत्याचं फोनवरच संभाषण: प्रसारमाध्यमाचा हवाला देत अंजली दमानिया यांच्या दाव्याने खळबळ
हा बडा नेता कोण ? तात्काळ त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा- अंजली दमानिया

छत्रपती संभाजीनगर- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे अतिशय भयानक व्हिडिओज असून एका बड्या नेत्याचं फोनवरच संभाषण झालं असल्याचं प्रसारमाध्यमांचा हवाला देत वरिष्ठ समाजसेविका अंजली दमानिया यांनी दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अंजली दमानिया म्हणाल्या की, आताच काही माध्यमांकडून कळलंय की सीयाडीने जी चौकशी केली आहे की त्या स्कॉर्पियोमध्ये दोन मोबाईल मिळाले. त्याचा डेटा रिट्रीव करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत तर इतकं डिस्टर्बिंग झालं की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही तर क्रुर असे हे कृत्य झाले पण आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचं फोनवरच संभाषण झालंय हे जेव्हा कळतयं तर हा बडा नेता कोण ? तात्काळ आता एका तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा. कोणाचा फोन त्या नंबरवर आला होता ? ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजे. हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.