महाराष्ट्र
Trending

पोलिस स्टेशनच्या आवारातच गुद्दा गुद्दी ! MIDC सिडको पोलिसांत फिर्याद द्यायला गेले अन् तिथेच भिडले !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ४ – लहान मुलांच्या भांडणावरून तिघे जण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले परंतू पोलिस स्टेशनच्या गेटच्या आतमध्ये हे तिघे पुन्हा भिडले. एकमेकांना गुद्दा गुद्दी करत असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांचे भांडण सोडवले. हा प्रकार MIDC सिडको पोलिस स्टेशनच्या आवारात घडला.

सहाय्यक पोलीस उप निरिक्षक दशरथ दत्तात्रय जाधव (नेमणुक / पोलीस स्टेशन MIDC सिडको छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 03/01/2024 रोजी 21:00 ते दि. 04/01/2025 दरम्यान 09:00 वाजेपर्यंत पोलिस स्टेशन MIDC सिडको छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची ड्युटी होती. 22:00 वाजे दरम्यान PSO रुममध्ये असतांना सहाय्यक पोलीस उप निरिक्षक दशरथ दत्तात्रय जाधव यांना मुख्य गेटकडे ओरडण्याचा आवाज आला. त्यामुले ते व सोबत पोलीस स्टेशनचे हजर पोलीस कर्मचारी असे घटनास्थळाकडे धावत गेले.

गेटच्या आतमध्ये पोलिस स्टेशनच्या आवारात तीन जण हे आपसात एकमेकांना धरुन गुद्दद्मगु‌द्दी करून वाद घालून दंगल करत होते. एकमेकास झुंज करत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांची सोडवा सोडव केली. त्यांना एकमेकांपासून बाजुला केले. पोलिसांनी त्यांना त्यांची नावे व पत्ता विचारला असता, त्यांनी त्यांची नावे 1) रोहित राजु ससाणे वय- 22 वर्षे व्यवसाय मजुरी रा- मनपा शाळेजवळ ब्रिजवाडी छत्रपती संभाजीनगर, 2) दीपक बबन शिंदे वय- 33 वर्षे व्यवसाय चहा टपरी रा- शनि मंदिराजवळ सायन लोहिया नगर छत्रपती संभाजीनगर, 3) मनोज भीमराव देवकर वय 26 वर्षे व्यवसाय खा. नौकरी रा- सायन लोहिया नगर छत्रपती संभाजीनगर असे सांगितले. वादाचे कारण विचारले असता, त्यांनी कळवले की, ब्रिजवाडी येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून भांडण झाल्याने पोस्टे ला एकमेकांविरुध्द तक्रार देणेकामी आलो होतो व या ठिकाणी परत आपसात वाद होवून एकमेकांना धरुन गुद्द‌द्मगुद्दी केली.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस उप निरिक्षक दशरथ दत्तात्रय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1) रोहित राजु ससाणे वय- 22 वर्षे व्यवसाय मजुरी रा- मनपा शाळेजवळ ब्रिजवाडी छत्रपती संभाजीनगर, 2) दीपक बबन शिंदे वय- 33 वर्षे व्यवसाय चहा टपरी रा- शनि मंदिराजवळ सायन लोहिया नगर छत्रपती संभाजीनगर, 3) मनोज भीमराव देवकर वय 26 वर्षे व्यवसाय खा. नौकरी रा- सायन लोहिया नगर छत्रपती संभाजीनगर यांच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनमध्ये कलम 194(2) 3 (5) BNS नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!