अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता मुख्याधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली!

BULDHANA | – बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नगर परिषदेच्या वतीने गेल्या काही दिवसापासून अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम नगर परिषद राबविण्यात येत आहे. दरम्यान शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यापुर्वी नगरपरिषदेने अतिक्रमण धारकांना नोटीस बजावल्या होत्या.
त्यामध्ये सुगनामल नागराणी यांनी खामगाव येथील सिव्हिल जज ज्युनिअर डीव्हिजन न्यायालयात नगर परिषद खामगाव विरूध्द निलकमल हॉटेल पाडू नये असा मनाई हुकूम मिळणेबाबत अर्ज केला होता. न्यायालयाने गुरुवारी ‘स्टेटस को चा आदेश पारित करून नगर परिषदेला निलकमल हॉटेल पाडण्यापासून मनाई केली होती.
सदर आदेशाची सूचना सर्व कागदपत्रांसह मुख्याधिकारी शेळके यांना आली असतांना मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांनी न्यायालयाच्या आदेशाला कचऱ्याची टोपली दाखवून शुक्रवारी निलकमल हॉटेलवर जेसीबी चालवून हॉटेल जमीनदोस्त केल आहे.
या प्रकरणी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध कंटेन ऑफ कोर्ट ची कारवाई व पोलिसात तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती नीलकमल हॉटेल मालक सुगनामल नगराणी यांचे वकील ॲड. डी.टी नागराणी दिली आहे.






























