माजी उपमहापौर विजय औताडे यांच्या गाडीतून पैशांची बॅग लंपास ! हर्सूलच्या हरसिद्धी माता मंदिर पार्किंगमधून चोरट्याने डाव साधला !!

छत्रपती संभाजीनगर- माजी उपमहापौर विजय औताडे यांच्या गाडीतून 70 हजार 897 रुपये किंमतीच्या ऐवजाची बॅग चोरट्याने लंपास केली. हर्सूलच्या हरसिद्धी माता मंदिर परिसरातील पार्किंगमधून चोरट्याने हा डाव साधला. 30/12/2024 रोजी सकाळी 07.45 वाजेच्या सुमारास ही चोरी झाली.
यासंदर्भात फिर्यादी सौरभ राजेद्र दांडगे (वय 22 वर्ष, ड्रायव्हर, रा, ईकवत गोळेगाव ता. सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ह,मु. एस बी ओ शाळेसमोर सुरेश गायके यांच्या घरी किरायाने छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केले आहे की, यातील फिर्यादी यांच्या मालकाची फोरव्हीलर क्रमांक MH-20-BY-9404 फोर्ड ही हरसिध्दीमाता मंदिर येथे देवीच्या मंदिरा समोरील पार्कीग येथे लावली.
फोर व्हीलरच्या मागील शिटवर फिर्यादिचे मालक विजय औताडे यांची एक बॅग होती त्या बॅगमध्ये 1) 15,500 रुपये कॅश 2) वन प्लस कंपणीचा मोबाईल 3) हेडफोन, 4) चार्जीग केबल व चार्जर, 5) पावर बँक 6) बॅग इत्यादी हरसिध्दीमाता मंदिर येथे देवीच्या मंदिरा समोरील पार्कीग हर्सूल छत्रपती संभाजीनगर येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.
चोरीस गेलेल्या बॅगमध्ये 1)15,500/ रुपये कॅश ज्यात 500 रुपये च्या 31 नोटा 2) 43,999/ रुपये किमतीचा वन प्लस कंपणीचा मोबाईल 3) 1,999/ रुपये किमतीचे बोट कंपणीचे हेडफोन 4) 2500/ रुपये किमतीची चार्जीग केबल व चार्जर 5) 3,999/ सॅमसंग कंपणीची पावर बँक 6) 2900/ रुपये किमतीची बॅग असा एकूण-70 हजार 897 रुपये किंमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
याप्रकरणी सौरभ राजेद्र दांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यावर हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं-344 /2024 कलम 303 (2) BNS गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह गाडेकर करत आहे.