महाराष्ट्र
Trending

पोलीस पत्नीचा गणवेश परिधान करून पतीने अनेकाना गंडवले

तोतया पोलिसाला नाशिक शहर पोलिसांनी केली अटक

NASHIK | – पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचे गणवेश परिधान करून नाशिक शहरासह अनेक ठिकाणी फसवणूक करणाऱ्या बनावट पोलिसाला (तोतया पोलिसाला) अखेर नऊ महिन्यांनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलीय.

सागर दिगंबर पवार असे संशयिताचे नाव असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली आहे. तोतया पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून उपनिरीक्षक पत्नीचा वर्दीचा वापर करत होता.

या माध्यमातून त्याने अनेकांना गंडा घातला आहे. पोलीस पत्नीच्या गणवेशाचा वापर करून तो स्वतः उपनिरीक्षक असल्याचे भासवत होता. नऊ महिन्यापासून सागर पवार हा फरार होता अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सापळा रचून पथकाने संशयित सागरला शिताफीने अटक केलीय.

– पत्नीच्या पोलीस गणवेशाचा वापर
– पोलीस असल्याचे भासवत महिलांशी फसवणूक
– पोलिसांत ओळख सांगून विविध ठिकाणी फिरायचा
– विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल
– नोकरी, गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्याचे आमिष
– पोलिसांच्या वर्दीचा गैरवापर करून पोलीस यंत्रणेचा गैरवापर
– पोलीस असल्याचे भासवून ओळख लपवत राहणे

Back to top button
error: Content is protected !!