
BEED – बीडच्या पाटोदा येथील व्यापारी संजय कांकरिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या गाडीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट आढळली असून, यामध्ये दोघा जणांनी व्याजाने दिलेले पैसे परत दे म्हणून उचलून नेऊन चटके देण्याची धमकी दिली होती.
वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
आता या प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात अमृत भोसले आणि दीपक साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघेही फरार आहेत. तर दुसरीकडे या आरोपींना तात्काळ अटक करावी. अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. आरोपी अटक न झाल्यास कुटुंबीयांच्या देखील जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.