महाराष्ट्र
Trending

बिबट्याच्या हल्ल्यात एक जण ठार

NASHIK | – चांदवड -तालुक्यातील भडाणे -रायपूर शिवरस्ता येथे गुरुवार दि .५जून रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान मजुरी करून घरी परत येत असताना गट नंबर 83 लगत रामदास सिताराम आहेर वय 45 या इसमाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. भडाणे रायपूर शिवरस्ता येथून सचिन भाऊसाहेब आहेर हे रस्त्याने गाडीवर जात असताना त्यांना अचानक रक्त दिसले व झाडांमध्ये आवाज आला. त्यांनी गाडीचा प्रकाश चमकावला असता त्यांना बिबट्या दिसला त्यांनी आवाज देऊन परिसरातील नागरिकांना बोलावले. तर त्या ठिकाणी रामदास आहेर हे निदर्शनात आले व रघुनाथ सुखदेव वाघ यांनी ही माहिती पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांना दिली व त्यांनी तात्काळ वन विभागाला बोलवून पुढील प्रक्रिया सुरू केली. रात्री रामदास आहेर यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे नेण्यात आले वन विभागाची पुढील पंचनामा तपास चालू आहे. रामदास आहेर यांच्या पश्चात तीन मुली व एक मुलगा, आई, वडील, मोठे बंधू असा त्यांचा परिवार आहे.

आज शुक्रवारी सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेत शिवारात येऊन पाहणी केली असता या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे असे सांगितले व या ठिकाणी दोन पिंजरे लावण्यात आले. वन्य पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनीही शासनाकडून जी मदत होईल आम्ही प्रयत्न करू असे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी सतर्क करावे. शाळेतील मुलांना जाताना काळजी घ्यावी शेतात जाताना रात्रीच्या वेळेस बॅटरीचा वापर करावा परिसरात वन विभागाने गस्त घालावे अशी झाल्टे यांनी माहिती दिली.घटनास्थळी म. उप-वनंसरक्षक, नाशिकचे उमेश वावरे , सहाने , (स.व.सं. मनमाड स्थित चांदवड ) संजय वाघमारे, ( व.प.अ चांदवड (प्रादे.) , वैभव गायकवाड, अजय शिंदे-वनपाल, खंदारे, साळवे, श्रीम. मरशिवणे, चव्हाण, परदेशी, . व्हरगळ, टेक मार्गेपाड-वनरक्षक , शिंदे, देवरे, वाघ, पवार वनसेवक यांनी परिसरात भेटी देऊन पाहणी केली.
या संदर्भात सहाय्यक वन संरक्षण अधिकारी चांदवड यांनी अधिक माहिती दिली.

Back to top button
error: Content is protected !!