
CHH.SAMBHAJINAGAR – छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालय संघटनेतील परिचारिकांनी आंदोलन पुकारण्यात आले आहे. शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील परिचारिकांना, वेळोवेळी रुग्णालय प्रशासन प्रभारी अधिसेविका श्रीमती लता ढाकणे यांच्याकडून त्रास होत असल्याबाबत पुराव्यानिशी कळविले होते.
तरीसुद्धा स्थानिक प्रशासनाने याबाबत कसलीही कार्यवाही केली नाही. उलट प्रभारी अधिसेविका लता ढाकणे यांना वेळोवेळी पाठीशी घातले, त्यामुळे त्यांच्या पदाचा गैरवापर व मनमानी कारभारात अधिकच भर पडत आहे.
यामुळे कार्यरत परिचारिकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असून, त्या मानसिक तणावाखाली सेवा देत आहेत. प्रशासन संचालनालयाने वेळोवेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्या समवेत, सलोखा व सामंजस्याने चर्चा करून परिचारिका संवर्गाचे प्रश्न सोडविण्याबाबत गांभीर्याने अधिसेविका व संस्था प्रमुख यांना आदेशीत केले आहे तरी आदेशाची पालन होत नसल्यामुळे आज आज पासून परिचारिका संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष महेंद्र बनसोडे यांनी दिली आहे.