महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

⚡ साजापूर विद्युत उपकेंद्राच्या कामात आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल 👮‍♂️ खबरदार महावितरणच्या कामात अडथळा आणाल तर !

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील साजापूर सुरू असलेल्या महावितरणच्या विद्युत उपकेंद्राच्या कामात वारंवार अडथळे आणून महिला अभियंता व ठेकेदारास धमकावल्याची धक्कादायक घटना घडलीया प्रकरणी कलीम चाँद पठाण व त्याच्यासोबतच्या चार ते पाच इसमांवर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

        साजापूर येथील गट नं.44मध्ये शासनाच्या महत्त्वाकांक्षी एमएसकेव्हीवाय-2.0 (मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनाअंतर्गत नवीन 33 केव्ही उपकेंद्राचे काम सुरू आहेसदर जमीन शासनाने महावितरण कंपनीस वाटप केलेली असूनजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी उपकेंद्राचे बांधकाम सुरू आहेमात्र या कामास काही स्थानिक व्यक्तींकडून सातत्याने विरोध होत असल्याने 20 एप्रिल 2026रोजी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्तांच्या उपस्थितीत उपसरपंचजि.सदस्यस्थानिक नागरिकमहावितरण अधिकारीनायब तहसीलदारतलाठी व भूमी अभिलेख कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होतीया बैठकीत संबंधितांना नियमानुसार महावितरणला विनाअडथळा काम करू देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होतेअन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही सूचित करण्यात आले होतेत्यानुसार 23‍ एप्रिल 2026पासून पोलिस संरक्षणामध्ये काम पुन्हा सुरू करण्यात आले.

        तथापि, 13 मे 2026 रोजी कलीम चाँद पठाण (खानयाच्यासोबत काही इसमांनी कामाच्या ठिकाणी येऊन तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काम बंद ठेवण्याचा आदेश येईपर्यंत काम बंद ठेवा‘, असे एजन्सीचे सुपरवायजर अमित कुमार यांना धमकावून सांगितलेयानंतर 19मे 2026 रोजी रात्रीच्या अंधारात कलीम चाँद पठाण व त्याच्या सोबतच्या लोकांनी उपकेंद्रांच्या कंपाउंडच्या बांधकामाची जाणीवपूर्वक तोडफोड करत नुकसान केलेतसेच पूर्वी केलेले उत्खनन माती टाकून बुजवून टाकलेया कृत्यामुळे महावितरणचे एकूण अंदाजे साडेतीन लाख रुपये इतक्या शासकीय मालमत्तेचे नुकसान झालेही मंडळी शासकीय कामात वेळोवेळी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करून काम बंद पाडत आहेतसदर घटनेबाबत महावितरणतर्फे 20 मे 2026 रोजी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आलेली होती.

         त्यानंतर सप्टेंबर 2026 पासून महावितरणचे एजन्सीमार्फत काम सुरू झाले. 9 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी साडेबारा वाजता महावितरणच्या ग्रामीण-1 विभाग कार्यालयातील सहायक अभियंता (पायाभूत आराखडाचैताली जगदाळे यांच्यासह एजन्सीचे अमितकुमार सिंगगणेश दाभाडेमनीष गुंठामहावितरणचे जनमित्र उद्धव शेळकेमहेश कराळे हे हजर असताना कलीम चाँद पठाण व त्याच्यासोबतचे इसम हे गट नं.44 साजापूर मैदान येथे आलेत्यांनी उपकेंद्राच्या कामकाजात अडथळा निर्माण केला. ‘तुम्ही येथे कामकाज करायचे नाही‘, असे पठाण याने सहायक अभियंता जगदाळे यांना धमकावलेनंतर एजन्सीच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात कंपनीचे कामकाज बंद पाडले. ‘तू येथे कसे काय काम करतो तेच बघतोपोलिस संरक्षणात जरी काम केले तरी तुला बघून घेऊ‘, असे म्हणत पठाणने ठेकेदाराला मारहाणीची धमकी दिली.

        या प्रकरणी सहायक अभियंता चैताली जगदाळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कलीम चाँद पठाण व त्याच्यासोबतच्या चार ते पाच इसमांवर वाळूज पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला

Back to top button
error: Content is protected !!