महाराष्ट्र
Trending

संजय शिरसाठ यांनी परिवाराच्या नावावर घेतली वर्ग -2 ची कोटीची प्रॉपर्टी या जमिनीसाठी एक गँग काम करीत आहे याची चौकशी झाल्यास मोठ रॅकेट समोर येईल

इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाठ यांच्यावर गंभीर आरोप

CHH. SAMBHAJINAGAR |- ज्या ज्या संघटनांना वाटत आहे, माझ्यासोबत चर्चा करायची, तर मी चर्चा करायला तयार आहे. आपण कुठेही बोलावले तर मी यायला तयार आहे.
– मी कागदपत्रांच्या आधारावर बोललो आहे. ज्यांनी बोलायला पाहिजे ते बोलत नाही. मात्र ज्यांचं काहीही संबंध नाही, अशी लोक उडया मारत आहे.

– VITS हॉटेल प्रकरणात देखील संजय शिरसाठ यांनी किती पार्टनर आहेत, ते कोण आहेत? हे स्पष्ट केलेले नाही.
– अजून अनेक प्रकरण समोर आले आहे.

इम्तियाज जलील यांचा पुन्हा एक गंभीर आरोप :
– नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मंत्री संजय शिरसाठ यांचा पंच तारांकित हॉटेल चे काम सुरू आहे. ते जाऊन मी पाहणी करणार.
– मागच्या काही महिन्यात संजय शिरसाठ यांनी परिवाराच्या नावावर किती आणि कशी प्रॉपर्टी घेतली आहे.
– वर्ग दोन ची जमीन जी विकता येत नाही, ती साजपूर मधील गट क्रमांक ८ मधे आहे. ती विकत घेतली. 4 हेक्टर जागा आहे, ती स्वतःच्या मुलगा सिद्धांत शिरसाठ यांच्या नावे घेतली आहे.
– ज्या ठिकाणी ही जागा आहे. त्या ठिकाणी 3 कोटी रुपये एकर भाव सुरू आहे. बाजूलाच प्लॉटिंग सुरू आहे. मात्र त्याचा भाव 9 कोटी आहे.
– 10 एकर जमीन 1 कोटी 10 लाखात घेतली आहे. ही जमीन हरिजन समाजासाठी आहे. यामध्ये कुणीही पार्टनर नाही.
– तुषार संजय शिरसाठ, सिद्धांत संजय शिरसाठ अशी मंत्री संजय शिरसाठ यांच्या दोन्ही मुलाच्या नावे आहेत.
– वर्ग दोनची जमीन विकण्यासाठी जिल्हाधिकारी यांची सही लागते.
– तत्कालीन महिला तलाठी यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता.
– बागडे नावाचे एक तलाठी या मध्ये होते. ते यापूर्वी आठ वेळा सस्पेंड होते. ते सस्पेंड असताना 8 महिन्यासाठी तलाठी बागडे यांना रुजू करण्यात आले होते.
– तत्कालीन महिला तलाठी शिक्का मारायला तयार न्हवती. त्यामुळे शिक्का हिसकावण्याचा प्रयत्न झाला.
– मी खासदार असताना केंद्र सरकारच्या आयुष रुग्णालयासाठी मी जिल्हाधिकारी यांना वारंवार पत्र व्यवहार करीत होतो. मात्र जागा नसल्याचे सांगत होते.
– हे प्रकरण महसूल राज्यमंत्री यांच्याच पक्षाचे अब्दुल सत्तार होते. त्यांनी जमीन देण्यासाठी ऑर्डर दिली.
– ऑर्डर देणारे तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांची देखील चौकशी व्हावी.
– वर्ग -2 च्या जमिनीसाठी एक गँग काम करीत आहे. याची चौकशी झाल्यास मोठ रॅकेट समोर येईल.
– शहरातील जालना रोडवर अदालत समोर 12 हजार स्क्वेअर फूट जागा पत्नी विजया शिरसाठ, मुलगा सिद्धांत शिरसाठ, तुषार शिरसाठ यांनी विकत घेतली आहे.
– ही जागा 5 कोटी, 83 लाख, 94 हजारात विकत घेतली आहे. ते दुपटीने जरी विकत असतील तर मी घेतो.
– जर गणित केलं तर 4800 प्रति स्क्वेअर फूट एवढ्या कमी रुपयात घेतले आहे.
– जानेवारी 2025 मध्ये ही घेण्यात आले.
– डिसेंबर 2024 सजापूर येथील गट क्रमांक – 34
– एकूण 2 एकर 2 गुंठे जागा 1 कोटी 50 लाख रुपयाला मुलगा सिद्धांत शिरसाठ यांच्या नावावर घेतली.
– आणि त्याच गट क्रमांकात अजून 2 एकर जागा घेतली.
– अजून त्याच गट मध्ये सप्टेंबर 2024 2 एकर 16 गुंठे जागा 60 लाख रुपयात घेतली. ती पत्नी विजय संजय शिरसाठ यांच्या नावावर घेण्यात आले आहे.
– गट क्रमांक – 34 मध्ये एका मोठ्या हॉटेल बांधणे सुरू आहे. आणि या हॉटेलसाठी बेकायदा मुरुमचे उत्खनन करून ते वापरले जात आहे. याचे व्हिडिओ मी काढले आहे. ते सर्वांना देणार.
– SC समाजाचे काही भामटे माझ्या मागे लागले आहे.
– जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी.
– या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर, मंत्री संजय शिरसाठ यांनी मी ज्या प्रमाणे कागदपत्रांच्या पुराव्यासह पत्रकार परिषदेत मांडले आहे. तसे तुम्ही स्पष्ट करावे.
– या सर्व प्रकरणावर ठाकरेंची शिवसेना व विरोधी पक्ष का गप्पा बसला आहे. त्यांचे जून प्रकरण निघतील म्हणून गप्प आहे का?
– त्यांना अगोदर मिडिया चांगला लागायचं, जगभरात काय चाललं त्यावर बोलायचे आणि आता कसे मिडिया ट्रायल म्हणतात.
– मोठ मोठे अधिकारी बोलावून अकाउंट तयार केले जात आहे. कसे या प्रकरणातून बाहेर निघावे. ते मुंबईला आहेत. तेथेही काही सुरू असेल.
– एकदा मिडियाला उत्तर द्या.

– माझे मुद्दे अजून संपलेले नाहीत. मी सर्व प्रकारांची पुराव्यासह एक सविस्तर तक्रार बनविणार आहे. आणि त्या नंतर रीतसर तक्रार करणार.
– मी राज्यपाल यांना पत्र दिले आहे. त्यांच्याकडे वेळ मागितली आहे.
– मी CBI सह इतर यंत्रणेकडे तक्रार करणार, न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाणार.
– मी प्रश्न विचारला म्हणून माझ्या घरावर शेनफेक करण्यासाठी गुंड पाठवतात.

Back to top button
error: Content is protected !!