महाराष्ट्र

लग्नानंतर उघड झालं गुप्त रहस्य; पत्नी हादरली 😢 नपुंसकतेचं छुपं सत्य? 🏠 संसार कोसळला!

नपुंसकतेची माहिती लपवून लग्न; १५ लाखांची मागणी व छळप्रकरणी गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर :

पती नपुंसक असल्याची माहिती लपवून संगनमताने लग्न लावून देत १५ लाख रुपयांची मागणी केल्याचा तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पतीसह एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाआधीच माहिती लपविल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडेगाव येथील फिर्यादी महिलेने तक्रार दिली आहे. फिर्यादीचा आरोप आहे की, त्यांचे पती हे नपुंसक असल्याची माहिती आरोपींना माहीत असतानाही ती बाब जाणूनबुजून लपविण्यात आली. सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादीसोबत लग्न लावून देत फसवणूक केली.

१५ लाखांची मागणी, शिवीगाळ व मारहाण

लग्नानंतर नाशिक येथे फ्लॅट घेण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण न केल्यामुळे फिर्यादी तसेच त्यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ करण्यात आली. यानंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत फिर्यादीचा शारीरिक तसेच मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप तक्रारीत नमूद आहे.

पतीसह १२ आरोपींवर गुन्हा

या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गुन्हा दाखल, तपास सुरू

ही घटना २० मे २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून आजपर्यंत अंदरसुल, तालुका येवला, जिल्हा नाशिक तसेच खुटवड नगर, नाशिक येथे घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.१९ वाजता गुन्हा रजिस्टर नंबर २८/२०२६ अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सय्यद करत असून, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!