
NANDED | – ओव्हरलोड वाळूने भरून जात असलेल्या हायवा ट्रॅक खाली चिरडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज बिलोली शहरात घडलीय, बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असून, त्याची वाहतूक अवजड हायवा ट्रक मधून केली जात आहे,
आज सकाळच्या सुमारास बिलोली येथील सगरोळी रेतीघाटातुन क्षमतेपेक्षा जास्त रेती हायवामध्ये भरून बिलोली शहरातून जात असताना हायवा ट्रकने दुचाकी स्वाराला धडक देत त्याला चिरडून टाकल्याची घटना घडली आहे, या वारंवार घडत असलेल्या अपघातांना महसूल प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचं बोलल्या जात आहे..